साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
शहरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरासह तालुक्यात विविध उपक्रम साजरे करण्यात आले. मुक्ताईनगर येथील मुख्य असलेल्या प्रवर्तन चौकात सकाळी नऊ वाजता महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांना माल्यार्पण करत सर्व समाज बांधवातर्फे अभिवादन करण्यात आले.
सुरुवातीला भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष शरद बोदडे आणि भारतीय बौद्ध महासभेचे विश्वंभर अडकमोल यांनी उपस्थित तरुण, बालक, बालिका, महिला, पुरुष यांना त्रिशरण पंचशील दिले. ते सामूहिकरित्या उपस्थित बांधवांनी ग्रहण केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस.ए.भोई यांनी उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे सर्व बहुजनांसाठी केलेले कार्य त्यांचे विचार तसेच माता रमाबाई यांचा त्याग याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे राज्याचे संघटक के.वाय.सुरवाडे, प्रा.डॉ.संजीव साळवे, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, सुनील अढागळे, राहुल सोनवणे, सुधाकर बोदडे, पंचशील टेलर, अनिल बोदडे, राजूसिंग बोदडे, रवींद्र बोदडे, बापू ससाने, प्रा. डॉ.संतोष थोरात, प्रा.डॉ.कृष्णा गायकवाड, समाधान गायकवाड, बी.डी.गवई, दलित मित्र वल्लभ चौधरी, ठोसरे गुरुजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू माळी, बाळा भालशंकर, बबलू सापधरे, प्रभाकर पाटील, पूर्णडच्या सरपंच मनीषा देशमुख, माजी सरपंच प्रवीण पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक ह.रा. कोळी, मोहन मेढे, ॲड. एस.एम.तायडे, धनंजय सापधरे, घोरपडे आप्पा, किशोर बोदडे, अरुण सवरने, जीवन मोरे, जगदेव इंगळे, समता सैनिक दलाचे अरुण वानखेडे, अमर बोदडे, विश्वनाथ गणेश, मोहन मेढे, साहित्यिक अशोक फकीरा भालेराव, साहित्यिक उल्हास निकम, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, अफसर खान, गणेश टोंगे, पंकज राणे, संतोष माळी, मुशीर भाई, नगरसेवक राजेंद्र हिवराळे, आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, प्रफुल्ल पाटील, कैलास रोजोदकर, किरण सावकारे यांच्यासह तालुक्यातील महिला, बालक, आंबेडकरी अनुयायी यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधार करुन उपस्थिती देऊन महामानवास अभिवादन केले.
शहरातून निघाली दुचाकी रॅली
शेवटी सरणत्तयाने कार्यक्रमाचा समारोप झाला. प्रवर्तन चौकात माता रमाई हमाल संघटनेतर्फे अल्पोपहार देण्यात आला. त्यानंतर प्रवर्तन चौकातून भव्य अशी मोटार सायकल रॅली शहरात काढण्यात आली. संपूर्ण शहर शुभेच्छांचे फलक, बॅनर्स तसेच स्वागत कमानी, पताकांनी तसेच झेंड्यांनी सजलेले होते. यासाठी भव्य असे स्टेज उभारण्यात आले होते. सर्व समाज बांधवांतर्फे जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.