१५ जोडप्यांच्या हस्ते अभिषेक, १०१ भाविकांच्या हस्ते महाआरती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील पिंप्राळा परिसरातील सोनी नगरातील भाविकांची मनोकामना पूर्ती करणाऱ्या जागृत स्वयंभू महादेव मंदिराला ७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दानशूर दात्यांकडून मंदिरात गुरुवारी, १० जुलै रोजी साडे सात किलो वजनाचे पितळी शिवलिंग बसविण्यात आले. तसेच १५ जोडप्यांच्या हस्ते रुद्राक्ष अभिषेक, पंचामृत विधिवत पूजा करून १०१ भाविकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
शिल्पकार गजानन तांबट यांनी १० जुलै रोजी शिवलिंग बसविल्यानंतर ११ जुलै रोजी मंदिरात महिलांनी रांगोळी काढली होती. त्यानंतर सकाळी साडे सात वाजता राजेश वाणी, गणेश राणे, प्रकाश गजाकुश यांच्या हस्ते महादेव शिवलिंगाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर चेतन कपोले महाराज यांच्या अमृतवाणीतून १५ जोडप्यांच्या हस्ते रूद्राक्ष अभिषेक, पंचामृत दुग्धाभिषेक विधिवत पूजा करण्यात आली. दानशूर दाते यांच्या सहकार्याने साडे सात किलोचा पितळी शिवलिंग आणि स्टील रिलिंगचा मेन दरवाजा भेट देण्यात आला. मंदिराची स्थापना गेल्या ११ जुलै २०१८ ला केली होती. मंदिराला ७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुक्रवारी सकाळी साडे सात वाजता पूजेला सुरुवात करण्यात आली.यावेळी महादेवाला १०८ बेलपत्रे, फुलांच्या माळा, श्रीफळ, प्रसाद भाविकांनी अर्पण केले.
जोडप्यांच्या हस्ते विधिवत पूजा करणाऱ्यांमध्ये गणेश राणे-मनिषा राणे, प्रकाश गजाकुश-प्रमिला गजाकुश, विकास काबरा-आरती काबरा, श्रीकृष्ण मेंगडे-ज्योती मेंगडे, विकास जांगिड-कविता जांगिड, प्रवीण आढाव-नीलिमा आढाव, विलास शिरसाठ-मंगला शिरसाठ, शरद पाटील-सुवर्णा पाटील, अजय बागडे-आशा बागडे, पंकज राजपूत-कल्याणी राजपूत, पवन पाटील -स्वाती पाटील, दीपक महाले-पल्लवी महाले, रुपेश पाटील-मोनिका पाटील, विजय चव्हाण-मनिषा चव्हाण, नरेश बागडे-राधिका बागडे यांच्या हस्ते पितळी शिवलिंगाची पूजा करण्यात आली. त्यानंतर राजेश वाणी, गणेश राणे, प्रकाश गजाकुश, भैय्यासाहेब बोरसे, सरदार राजपूत, यशवंत पाटील, विनोद निकम, डॉ.कमोलखी बंगाली, धनराज कुंभार, विठ्ठल जाधव, शान हेमराज गोयर, मधुकर ठाकरे, सोपान पाटील, नारायण येवले, निलेश जोशी, विलास निकम, उमेश येवले, शैलेश जोशी यांच्यासह १०१ भाविकांच्या हस्ते गणपती आरती, महादेवाची महाआरती करण्यात आली.
भाविकांना केले प्रसादाचे वाटप
भाविकांनी सकाळपासून मोठ्या संख्येने गर्दी केली होती. भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी उमेश येवले, शान गोयर, गजानन तांबट, पवन सोनवणे, मधुकर ठाकरे, अजय बागडे तसेच मनपाचे आरोग्य निरीक्षक रमेश कांबळे, मुकेश थांबे, नरेश बागडे, सरदार राजपूत, संजय भोई, यशवंत पाटील, संजय मिस्तरी, अजय राणा आदींनी परिश्रम घेतले.