साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळे येथे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रभु श्रीराम यांच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आजपासून प्रत्येक घरावर दिवे लावण्यात आले. प्रत्येक घरासमोर सडा, रांगोळी टाकण्यात आली. यानिमित्त ह.भ.प. मुकेश महाराज अम्बा पिंप्रीकर यांच्या किर्तनाचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने सर्व ग्रामस्थांनी उपस्थितीत प्रभू रामचंद्रांचे भजन व कीर्तनाचा लाभ घेतला. सकाळी अयोध्याहुन आलेल्या कलश व रामपादुकाची पालखीची संपुर्ण गावात ढोलताशा, भजनी मंडळ, रामधुन या मंत्र घोषणा देत तिघी गावातून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी प्रत्येक घरासमोर सुंदर रांगोळ्या काढलेल्या दिसत होत्या. प्रत्येक घरासमोर पाच दिव्य व घरावरच्या छतावरती भगवा झेंड, भगवा रंगाचे पताके लावण्यात आले होते. सतेच घरावर श्रीराम असलेला ध्वज लावण्यात आला होता. यावेळी महिलांसह ग्रामस्थ उत्साहात फुगडी नाचत होते. संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. निंबा दला चौधरी यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन केले होते. सायंकाळी संपूर्ण गावातील सर्व ग्रामस्थांनी ज्येष्ठ, श्रेष्ठ मंडळींनी महाआरतीचे आयोजन केले होते.