साईमत, जळगाव : प्रतिनिधी
शहरातील लालबहादूर शास्त्री टॉवर येथे सोमवारी, २ ऑक्टोबर रोजी लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच महात्मा गांधी उद्यानात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम महात्मा गांधी पुतळ्याजवळ आयोजित केला होता. दोन्ही कार्यक्रमाचे आयोजन शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील १८ जानेवारी २०२३ चे परिपत्रकाच्या अनुषंगाने जळगाव मनपा प्रशासनाकडून आयोजित केले होते.
शास्त्री टॉवर चौकातील लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास आणि महात्मा गांधी उद्यानातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास मनपाचे प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, कार्यालय अधीक्षक दीपक फुलमोगरे, शाखा अभियंता मनीष अमृतकर, प्रभाग अधिकारी प्रकाश सोनवणे यांनीही पुतळ्यास माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी सुरेश कोल्हे, सुशील बोरसे, जितेंद्र धनगर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
