साईमत जळगाव प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्रातील हिंदी विभागात सन २०२२-२०२३ मध्ये झालेल्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली प्रितिशा गावित व व्दितीय क्रमांकाचा विद्यार्थी निलेश बागुल या दोघांना बँक ऑफ बडोदाच्या क्षेत्रीय कार्यालयातर्फे दिल्या जाणा-या शिष्यवृत्तीने गौरविण्यात आले.
सन २००६ पासून बँक ऑफ बडोदाच्या क्षेत्रीय कार्यालयातर्फे दरवर्षी हिंदी विभागातील एम. ए. हिंदी विषयात प्रथम व व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यास रूपये अकरा हजार व सात हजार पाचशे रोख आणि प्रशिस्तपत्र देवून गौरविण्यात येते. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते प्रितिशा गावित व निलेश बागुल या दोघांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली. बँकेचे व्यवस्थापक सुरेश खैरनार, प्रशाळेचे संचालक प्रा. मुक्ता महाजन, बँकेचे राजभाषा अधिकारी शिवमकुमार, निखिलकुमार, डॉ. प्रीती सोनी उपस्थित होते. डॉ. पुरूषोत्तम पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून आभार मानले.