लक्ष्मी नगर उड्डाणपुलाजवळ लक्झरी बस-टँकरचा अपघात

0
20

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

लक्झरी बस आणि टँकरच्या झालेल्या जबर धडकेत टँकरचा चालक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी, ६ डिसेंबर रोजीच्या रात्री राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी नगर उड्डाणपुलाजवळ घडली. रिमझिम पाऊस सुरु असल्यामुळे ट्रकचे ब्रेक लागले नसल्याने अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.

सविस्तर असे की, अकोल्याकडून भुसावळकडे जाणारी लक्झरी बस (क्र.एआर २० ए ३५०७) तर जळगावकडून खामगावकडे जाणारा टँकर (क्र.जीजे १६ एडब्ल्यू ३८०४) या दोन्ही वाहनांमध्ये लक्ष्मी नगर उड्डाणपुलाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात टँकरचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. लक्झरी बसमधील ३५ ते ४० प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी आणि नागरिकांनी मिळून टँकर चालकाला काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविल्याने त्याचा जीव वाचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here