उस्मानाबाद जिल्ह्यातही लंपी स्किन आजाराची एन्ट्री- जिल्हातील दोन तालुक्यातील सात अहवाल पॉझिटिव्ह

0
8

साईमत लाईव्ह उस्मानाबाद प्रतिनिधी

राज्यात लंपी स्किन आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात या आजाराने एन्ट्री केली आहे. त्यामुळे पशुपालकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

यासाठी जनावरांचे लसीकरण करणे योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. लंपी स्कीन डिसीज आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीची उपाय योजना उपाय मनुन जनावरांच्या वाहतूकीवरही बंदी बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रशासनाने प्रभावीपणे उपाययोजना करून जनावरांचा मृत्यूदर कमी करावा. लंपी स्कीनचा प्रादुर्भाव आपल्या जनावरांना होऊ नये यासाठी पशुपालकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने लोहारा व उमरगा तालुक्यातील संशयीत पशुधनाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. या अहवालामध्ये सात जनावरांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह अहवालापैकी उमरगा तालुक्यातील पाच लोहारा तालुक्यातील दोन अहवाल आहेत. लंपी स्कीन हा विषाणूजन्य आजार असल्यामुळे एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरांना त्याची लागण होते. त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here