जळगाव जिल्ह्यात पुन्हा कमळ फुलले ; महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी

0
58

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरशीची लढत होणार अशी चर्चा असतांना ही निवडणूक भाजपाने एकतर्फी जिंकत मोठे मताधिक्य राखले आहे. या निवडणुकीत रावेर लोकसभा मतदार संघातून रक्षाताई खडसे यांनी हॅट्रिक साधून भाजपाच्या विजयाची परंपरा कायम राखली आहे. दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी दणदणीत विजयी मिळवित जळगाव लोकसभा मतदार संघातून पहिल्या महिला खासदार होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.

पहिल्या फेरीपासून महायुतीचे दोनही उमेदवार हे आघाडीवर होते. लोकसभा मतदार संघाची मतमोजणी सुरू असतांना विरोधात असलेलेल महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप करत मतमोजणी थांबविण्यात आली होती. परंतु त्यानंतर सर्व गोष्टी क्लिअर केल्यानंतर मतमोजणीला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर पहिल्या फेरीपासून रक्षाताई खडसे या आघाडीवर होत्या. रावेर लोकसभा मतदार संघातून रक्षाताई खडसे यांना ६ लाख २७ हजार ६७२ मते मिळून २ लाख ७१ हजार ४८ मतांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत. तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांना ३ लाख ५६ हजार ६२४ मते मिळाली आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार स्मिताताई वाघ विजयी झाल्या आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार स्मिताताई वाघ यांना ६ लाख ६२ हजार ५७९मते मिळाली आहेत. स्मिताताई वाघ २ लाख ४७ हजार ११४ मतांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी करण पवार यांना ४ लाख १५ हजार ४६५ मते मिळाली आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांचा विजय निश्‍चित होत असल्याचे चिन्हे दिसू लागताच शहरातील जी.एम.फाऊंडेशनच्या भाजपा संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केल्याचे पहायला मिळाले. जळगाव लोकसभेतून महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्याने जळगाव शहरातील जी.एम.फाऊंडेशनच्या भाजपा कार्यालयात मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आ. राजूमामा भोळे, माजी खासदार ए.टी.नाना पाटील, उमेदवार स्मिताताई वाघ, उमेदवार रक्षाताई खडसे यांनी कार्यकर्त्यांसोबत फटाके फोडून एकच जल्लोष केला.

माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षाताई खडसे यांना भाजपाकडून तिसऱ्यांदा खासदारकीची उमेदवारी मिळाली होती, त्यात गेल्या दहा वर्षात त्यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि मतदार संघात केलेल्या कामामुळे त्यांची जनतेशी नाळू जळून होती. त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळेल की नाही यावर शंका निर्माण झाली होती. परंतू महायुतीच्या माध्यमातून त्यांना तिसऱ्यांना उमेदवार मिळाली आणि आता तिसऱ्यांदा देखील त्या मोठ्या फरकाने निवडून आल्या आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here