भव्य पालखी आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण
साईमत/जळगाव /प्रतिनिधी
श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित प्रभू श्री विश्वकर्मा जयंती २०२६ उत्सव शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा ठरला. सृष्टीचे निर्माते मानल्या जाणाऱ्या प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम पाहायला मिळाला. शेकडो भाविकांनी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांत भाग घेतला.
भव्य पालखी सोहळा आणि पूजन
शनिवार, ३१ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता ओंकारेश्वर मंदिर येथून प्रभू विश्वकर्मांच्या पालखीचा प्रस्थान झाला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, जयघोषात आणि भक्तिगीतांच्या स्वरांत निघालेली ही पालखी हाटनूर वसाहत हॉल आणि महाबळ येथे पोहोचली. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना विश्वकर्मा समाजाच्या ऐक्याचे आणि समाजातील योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
मान्यवरांची उपस्थिती आणि सत्कार
कार्यक्रम ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक आणि मान्यवरांच्या हस्ते प्रभू विश्वकर्मांची महाआरती करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूमामा भोळे, पारोळा नगरसेविका कविता रमेश खैरनार, आणि मनोजालय फाउंडेशनचे विजय शांताराम सुतार उपस्थित होते.
यावेळी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला, तसेच समाज प्रबोधन आणि शैक्षणिक प्रगतीवर प्रकाश टाकला गेला. कार्यक्रमाचा समारोप महाप्रसाद वाटपाने झाला, ज्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला.
कार्यकर्त्यांचा परिश्रम आणि सहभाग
सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या वेळी उपस्थित होते .गाडी लोहार समाज संघटना पदाधिकारी: भूषण सांगोळे, संस्थापक अध्यक्ष हर्षल सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत तायडे, सचिव शरद बोरसे, यशवंत कापडे, निलेश देवरे, रावसाहेब बोरसे, प्रमोद रुल्हे, प्रवीण सोनवणे, मनोज बाविस्कर, राकेश मोरे, मिलिंद निकम, विक्की अहिरे, चेतन रुल्हे, सुहास वरले.
महिला प्रतिनिधी: अध्यक्ष नीता सांगोळे, संघटक बेबा सूर्यवंशी.संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय, आनंददायी आणि सामाजिक ऐक्याचे उदाहरण ठरला, ज्यामुळे जळगावकरांना प्रभू विश्वकर्माची उपासना आणि समाजसेवेची प्रेरणा अनुभवायला मिळाली.
