गुणवंत विद्यार्थ्यांसह पदोन्नतीप्राप्त समाज बांधवांचा गौरव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
साळी समाजाचे आद्यदैवत भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीभावाने नुकताच साजरा करण्यात आला. जिव्हेश्वर युवक मंडळातर्फे ओक मंगल कार्यालयात यानिमित्त गुणवंत विद्यार्थी, पदोन्नतीप्राप्त समाज बांधव यांना गौरविण्यात आले. प्रारंभी समाजाचे ज्येष्ठ समाज बांधव रामदास डहाके यांनी पोथी वाचन केले. गौरव आखडकर आणि प्रियंका आखडकर ह्यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा झाली. दिनेश लोखंडे आणि गिता लोखंडे या दाम्पत्यांनी पालखीचे पूजन केले. यानंतर जिव्हेश्वर महिला मंडळाच्या उपस्थितीत दीपाली खंडारे यांनी भगवान जिव्हेश्वरची भजने म्हणून मोठ्या जल्लोषात भगवान जिव्हेश्वरच्या नामघोष करुन महिला मडंळाने फुगड्या खेळुन पालखी यात्रा उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तथा सत्कारमूर्ती पदोन्नती नायब तहसीलदार गणेश साळी(ता.रावेर ) होते. यावेळी प्रमुख पाहुणे तथा सत्कारमूर्ती पदोन्नती बीएसएनएल डीव्ही.इंजिन म्हणून दतात्रय गणेश डहाके तर साळी समाज जिल्हाध्यक्ष अशोक दिवटे, ज्येष्ठ समाज बांधव सुधाकर साळी, मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष अरुण डहाके यांच्या हस्ते समाजातील गुणवंत तसेच विशेष नैपुण्य विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सहकारी पणन संस्थेतील प्रशांत भावडु धमके यांचाही पदोन्नती मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी मंडळाचे खजिनदार गणेश भोगरे, सहसचिव पद्माकर आखडकर, दिनेश साळी, सोहम डहाके, अवधेश भोगरे, दत्ता डहाके, हंसिका डहाके आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन युवक मंडळाचे उपाध्यक्ष सुधीर खंडारे तर सचिव किशोर खंडारे यांनी आभार मानले.