Farmers’ advice to students : शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहा ; शेतकऱ्यांचा विद्यार्थ्यांना सल्ला 

0
10

शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहा ; शेतकऱ्यांचा विद्यार्थ्यांना सल्ला 

जळगाव (प्रतिनिधी) –

जमिन कमी असली तरी चालेल मात्र तिला व्यावसायिक दृष्टीने बघितले पाहिजे भांडवल, बाजारपेठेसह जे जे नवतंत्र उपलब्ध आहे त्याचा वापर आवश्यकतेनुसार केला पाहिजे निर्यातक्षम उत्पादन घेतले पाहिजे. शेतीत सातत्य ठेवले पाहिजे, संघर्षाच्या काळातही तो करत राहिले पाहिजे, असा सल्ला शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ अकरावे अधिवेशनच्या तिसऱ्या टप्प्याची जैन हिल्सला सुरवात झाली. येथील शेती संशोधन प्रात्यक्षिक केंद्रातील क्षेत्रभेटीनंतर फालीच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आकाश ग्राऊंडवर झालेल्या चर्चासत्रात बुरहानपूर जिल्ह्यातील फोफनार येथील सचिन महाजन, चंदन महाजन, संदिप पाटील (वढोदा ता. चोपडा), बापुसाहेब पाटील (तरळी ता. शिरपूर), अंकुश पाटील ( खिर्डी ता. रावेर) या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. टरबूज, केळी, हळद, कापूस, जैन स्विट ऑरेंज, मोसंबी, लिंबू, हरभरा, गहू उत्पादनातील त्यांचे अनुभव सांगितले.

शिकून शेतीत आलात तर तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. शेती समोरील आर्थिक संकटे दूर करण्यात टिश्यूकल्चर रोपं महत्वाचे आहेत कारण एका रोपापासून चांगले उत्पादन होते. असे सांगत मका, केळी, टरबूज पिकाचे आर्थिक गणित त्यांनी मांडले. मातीच्या अनुभवातून बियाण्याची निवड केली पाहिजे. पाण्यासह खतांचा काटेकोर वापर केला पाहिजे. कृषीक्षेत्रातील नवसंशोधनाचे फायदे आणि वापरातून शेतकऱ्यांची समृद्धता याविषयी शेतकऱ्यांनी प्रश्नोत्तरांद्वारे सांगितले.

स्वयंचलित यंत्रणा, विविध फिल्टरच्या वापरातून पाण्याचा कार्यक्षमतेने वापर, वॉटर सोल्यूबल खतांचा वापर याविषयी सुद्धा माहिती दिली. विद्यार्थ्यांनी नििरक्षणातून कसे बदल करावेत याबाबत माहिती दिली. रेहांत फकिर, प्रणव पाटील, आकांक्षा सूर्यवंशी, आदिती मंदाळे, वेदांती चंदिवाल, रितु डाबी या फाली विद्यार्थ्यांनी चर्चेचे नेतृत्व केले. रोहिणी घाडगे, जुली पटेल यांनी सूत्रसंचालन केले.

फाली उपक्रमात तिसऱ्या टप्प्यात ४०० विद्यार्थी व फालीचे शिक्षक सहभागी झाले. पहिल्या दिवशी जैन हिल्स येथील फळ व भाजीपाला निर्जलीकरण प्रकल्प, परिश्रम, जैन हिल्स शेती संशोधन प्रात्यक्षिक केंद्र, ड्रीप डेमो, अल्ट्रा हायडेन्सिटी प्लान्ट डेमो प्लॉट, फ्यूचर फार्मिंग, एअर आलू, टिश्यूकल्चर येथे भेट दिली. टिश्यूकल्चर पार्क, फळ प्रक्रिया प्रकल्पास भेट देऊन निर्मिती प्रक्रिया जाणून घेतली.

दुपार सत्राच्या परिश्रम जैन हिल्स येथे गटचर्चा झाली. यामध्ये जैन इरिगेशनचे डॉ. सुब्रमण्यम, डॉ. कल्याणी मोहरीर, किशोर रवाळे, अतिन त्यागी, शिवकुमार, विजय वासीरेड्डी (आयटीसी), आयुषी मित्तल, दिव्या छांगलानी (प्रोमेप्ट), स्विटी वेगुंठा (हेरिटेज न्युट्रीव्हेर), मंगेश देशमुख (गोदरेज), अमित तायडे (नाबार्ड) , कैलास कालबंधा, प्रविणकुमार कासट (स्टार अग्री) , जामनेर तालुक्यातील हिंगणे येथील निलेश पाटील, शैलेश पाटील (पहूर) सहभागी झाले होते.

फालीचा आज ११ वा वर्धापन दिन होता यानिमित्ताने संस्थापिका नॅन्सी बॅरी यांच्यासह शिक्षक, अधिकारी आणि शेतकरी यांच्या उपस्थितित केक कापण्यात आला.

फाली-११ मध्ये सहभागी शाळांमधील फालीचे विद्यार्थी शालेय स्तरावरील व्यवसाय योजना आणि अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धांचे विजेते कृषी क्षेत्रातील संशोधनाविषयी सादरीकरण करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here