Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»‘Long Live The Brave Soldier’ : ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणा देत शहीद वीर पुत्राला अखेरचा निरोप
    जळगाव

    ‘Long Live The Brave Soldier’ : ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणा देत शहीद वीर पुत्राला अखेरचा निरोप

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 12, 2025Updated:August 12, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव तालुक्यातील गुढे गावात पसरली शोककळा; कर्तृत्व अन्‌ शौर्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

    ५७ वाहिनी सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल (जी.डी.) स्वप्निल सुभाष सोनवणे यांचा कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूनंतर मंगळवारी, १२ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांच्या भडगाव तालुक्यातील मूळ गावी गुढे येथे सैनिकी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. “वीर जवान अमर रहे” च्या घोषणा देण्यात आल्या. गावातील नागरिक, नातेवाईक, मान्यवर व माजी सैनिकांनी अश्रूंच्या धारा वाहत आपल्या वीर पुत्राला अखेरचा निरोप दिला. गेल्या ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी बीओपी ढोलागुरी येथे सीमा फ्लड लाईट खांब दुरुस्त करताना विजेचा धक्का बसून जवान सोनवणे गंभीर जखमी झाले होते. तातडीने त्यांना बाळुरघाट जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जवान सोनवणे यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचे कर्तृत्व व शौर्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

    त्यांच्या पार्थिवावर पूर्ण सैनिकी सन्मानाने मंगळवारी, १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतिम विधी पार पडले. यावेळी तहसीलदार शितल सोलाट, पोलीस उपनिरीक्षक सुधीर सोनवणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, ५७ बटालियन बीएसएफचे इन्स्पेक्टर कमल किशोर व सलामी पथक, माजी आमदार दिलीप वाघ, वैशाली सूर्यवंशी, सुमित पाटील, माजी सभापती विकास पाटील, शेतकी संघाचे चेअरमन भैय्यासाहेब पाटील, माजी जि.प. सदस्य संजय पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख समाधान पाटील, युवा नेते हर्षल पाटील, शिवदास पाटील, माझ्या सैनिक फेडरेशन भडगावचे अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष, सचिव तथा माजी सैनिक बापू पाटील, गुढेच्या सरपंच कल्पना महाजन, पोलीस पाटील मिलिंद मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Parola : वारसा हक्क डावलून आई-विरुद्ध सख्ख्या भावांनी मालमत्ता बळकावली

    January 21, 2026

    Jalgaon : महायुतीच्या नेतृत्वाखाली महापालिका; विकासकामांना नवा वेग

    January 21, 2026

    Jalgaon : खड्ड्यांवर आता पालिकेची जबाबदारी : अपघातग्रस्तांना नुकसान भरपाईचा मार्ग खुला

    January 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.