साईमत लाईव्ह फैजपूर प्रतिनिधी
येथिल धनाजी नाना महाविद्यालय येथे लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी यांनी स्वर्गीय बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या सामजिक आणि राजकिय जीवनातील यशस्वी कार्याबद्दल माहिती दिली.
ज्या प्रमाणे धनाजी नाना चौधरी यांनी देशासाठी प्राण पणाला लावून पोलिस अधिकारी पदाचा त्याग करून ब्रिटिशांशी लढा दिला तोच आदर्श घेत बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी जनतेच्या हितासाठी कार्य केले. त्याची प्रचिती रावेर यावल परिसरातील दुर्गम आणि डोंगराळ भागात झालेल्या विकासातून दिसून येते. त्यांच्या कार्याप्रती आज पुण्यतिथी निमित्त पूर्ण परिसरात विवीध ठिकाणी आदरांजली वाहण्यास जन समुदाय एकत्र येत असतो हीच त्यांची खरी कमाई आहे.
असे सांगीतले. या प्रसंगी उत्सव समितीचे प्रमुख डॉ.एस.एल बिऱ्हाडे प्रास्ताविकात लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या विकासाबद्दल माहिती देत दीर्घ काळापर्यंत त्यांचें कार्य प्रेरणा देत राहील असे सांगून श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. आय. भंगाळे, उपप्राचार्य प्रा. ए.जी. सरोदे, उपप्राचार्य प्रा.डी. बी. तायडे, तसेच सन उत्सव समितीचे सदस्य, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्र संचलन व आभार प्रा. डॉ. मारोती जाधव यांनी मानले.