साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र लष्करे यांना जळगाव जिल्हा क्रीडा महासंघातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रविवारी, २७ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये मार्गदर्शन केले. जिल्हास्तरावर क्रिकेट, बुद्धिबळ अशा विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. त्यांच्या कार्याची पावती म्हणून जिल्हास्तरीय मुख्याध्यापक आदर्श क्रीडा पुरस्कार देण्यात आला. जळगाव येथे नुकताच कार्यक्रम झाला. यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक मनोहर महाजन, प्रवीण पाटील उपस्थित होते. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
