‘मरीयन मेगा एक्सपो’तील चिमुकल्या वैज्ञानिकांनी वेधले लक्ष

0
6

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील मंगरूळ येथील सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कुलमध्ये रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘मरीयन मेगा एक्सपो’ विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. विज्ञानासोबतच इतिहास, भूगोल विषयातील मांडलेल्या उपकरणांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. विज्ञान प्रदर्शनात ३०० विद्यार्थ्यांनी उपकरणांची मांडणी केली होती. विज्ञान प्रदर्शनाचे तालुका विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सैनिकी शाळा कृती समितीचे राज्य समन्वयक उमेश काटे, तालुका विज्ञान मंडळाच्या सदस्या डॉ.भाग्यश्री वानखडे, मुख्याध्यापिका सिस्टर जोईस, उपमुख्याध्यापिका सिस्टर सिन्सी आदी उपस्थित होते.

शाळेचा विद्यार्थी उज्ज्वल पाटील याने तयार केलेली विज्ञान दिनाची थीम सादर करून अनोख्या पद्धतीने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. आकर्षक वैज्ञानिक रांगोळी, चंद्रयान मॉडल, स्मार्ट सिटी, सेंद्रिय शेती, छत्रपती शिवरायांचा इतिहास, ज्वालामुखी, भूकंप लहरी आदींसह विविध उपकरणांची मांडणी केली होती. यावेळी जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. परीक्षक म्हणून जगदीश पाटील, उमेश काटे, डॉ.भाग्यश्री वानखेडे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षिका पूजा शहा, श्‍वेता पवार, सिस्टर जॉमी, सोनल कालरा आदींनी सहकार्य केले. प्रास्ताविक हेमांगी सोनवणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here