‘Literacy’ Lessons Are Being : आमलाणमध्ये ‘असाक्षर’ गिरवताहेत ‘साक्षरतेचे’ धडे

0
21

उपक्रमाचे गटशिक्षणाधिकाऱ्यांसह अनेकांनी केले कौतुक

साईमत/नवापूर/प्रतिनिधी :

तालुक्यातील आमलाण येथे नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत ‘असाक्षर’ असणारे आता ‘साक्षरतेचे’ धडे गिरवून साक्षरतेकडे वाटचाल करु लागले आहेत. आमलाण येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बाळकिसन ठोंबरे, अलका पाडवी, लीना गावित यांनी असाक्षरांचा सर्व्हे करून उल्हास ॲपवर असाक्षरांची माहिती भरली. अशा स्तुत्य उपक्रमाचे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे, विस्ताराधिकारी रमेश देसले, केंद्रप्रमुख भगवान सोनवणे यांच्यासह अनेकांनी कौतुक केले.

स्वयंप्रेरक नेमून त्यांना असाक्षरांची यादी वाटून देऊन वर्ग सुरू करण्याची विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन स्वयंसेवक अशा अक्षरांना साक्षर करण्यासाठी काम करत आहेत.त्यासाठी स्वयंप्रेरक म्हणून प्रियंका गावित, बबीता वसावे, सुवर्ण गावित, रूपाली वसावे ह्या स्वयंसेविका काम करत आहेत. त्यामुळे असाक्षर प्राथमिक साक्षरता प्राप्त करून स्वावलंबी बनत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here