भडगावात उत्साहात पार पडली निष्ठावंतांची ‘दहीहंडी’
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी:
निष्ठावंतांची ‘दहीहंडी’ चा कार्यक्रम स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला आहे. दहीहंडीच्या थरांप्रमाणेच आपला पाया तत्वनिष्ठा व संस्कारांनी मजबूत असला पाहिजे. पाया मजबूत नसल्यानेच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे प्रतिपादन उबाठा शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी केले. क्रेनला लटकावलेली उंच दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळांनी प्रयत्न केले. अखेर चाळीसगाव येथील महावीर गोविंदा पथक मंडळाने बाजी मारत निष्ठावंतांची दहीहंडी फोडली. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या माध्यमातून भडगाव येथे आयोजित निष्ठावंतांच्या दहीहंडी कार्यक्रमाला भडगावकरांनी उदंड प्रतिसाद दिला. हजारोंच्या उपस्थितीत दहीहंडी कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमापूर्वी वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी सोशल मीडियात रीलस्टार म्हणून लोकप्रिय असणारे तृप्ती माने, भूषण परदेशी यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाला माजी खा. उन्मेष पाटील, कमल पाटील, दीपक राजपूत, उद्धव मराठे, सुरेश पवार, निलेश चौधरी, रामकृष्ण पाटील, मच्छिंद्र पाटील, दीपक पाटील, शंकर मारवाडी, जे.के.पाटील, शेतकी संघाच्या संचालिका योजना पाटील, मा.नगरसेवक राजेंद्र देशमुख, मनोहर चौधरी, सुभाष पाटील, इसाक मलिक, भिकणुर पठाण, संतोष पाटील, डी.डी. पाटील, माधव जगताप, चेतन पाटील, पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.
यांची लाभली उपस्थिती
कार्यक्रमाला दादाभाऊ चौधरी, अनिल सावंत, अभिषेक खंडेलवाल, बंडू मोर, खंडू सोनवणे, गोरखदादा पाटील, पप्पूदादा पाटील, रतन परदेशी, राजेंद्र मोटे, यश पाटील, पप्पू राजपूत, गजानन सावंत, संदीप जैन, हरीश देवरे, मनोज चौधरी, हरीभाऊ पाटील, राकेश सोनवणे, नितीन खेडकर, नितीन सोनवणे, अरमान तडवी, अरूण तांबे, निखील भुसारे, संतोष पाटील, जयश्री येवले, कुंदन पांड्या, अनिता पाटील, लक्ष्मी पाटील, द्वारका सोनवणे, उषाताई परदेशी, गायत्री पाटील, ज्योत्स्ना पाटील, सिंधू वाघ, सविता चौधरी, सुषमा भावसार, सुरेखा वाघ, रेखा शिरसाठ, गायत्री पाटील, सोनाली पाटील, नसीमबानो पठाण, निता भांडारकर, मनीषा पाटील, वैशली अमृतकर, मीनाक्षी पाटील यांच्यासह शिवसेना, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.