अमेरिकेतील मिशीगन येथील नॉर्थव्हिले येथे पार पडले पहिले लेवा संमेलन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
साता समुद्रापलीकडे ही आपली लेवा संस्कृती आपले लेवा बांधव टिकवून आहे, याचा खुप अभिमान वाटतो. त्याचा प्रत्यय आला अमेरिकेतील मिशीगन राज्यात असलेल्या नॉर्थव्हिले येथील लेवा समाज बांधवांच्या आयोजित केलेल्या पहिल्या संमेलनाच्या माध्यमातून लेवा समाजाचे अस्तित्व परदेशात टिकून राहत असून, समाजाची अस्मिता जपली जात आहे. अमेरिकेतील मिशीगन राज्यातील नॉर्थव्हिले येथील लेवा समाज बांधवांच्या आयोजनातून नुकतेच पहिले लेवा संमेलन उत्साहात पार पडले.
एप्रिल २०१९ दरम्यान विशाल महाजन आणि नितीन नारखेडे यांनी मिशीगन लेवा समाजातील बांधवांना एकत्र आणण्याच्या उद्देश्यातून एक ग्रुप सुरू केला. एकेक करत ७-८ परिवारांचा ग्रुप आज ४० परिवारांच्या ग्रुपमध्ये रुपांतरीत झाला. कोरोना काळापासून खोळंबलेल्या गेटटुगेदरला यावर्षी मुर्त स्वरूप लाभले.
नितीन नारखेडे, निलिमा नाफडे, निखिल इंगळे, तुषार चौधरी यांच्या नियोजनातून आणि रवींद्र पाटील, अनिता नारखेडे, विशाल महाजन, ललित नारखेडे व अन्य क्रियाशील लेवापाटीदार बांधवांच्या संयुक्त सहभागातून मिशीगनमधील लेवा समाजाचे प्रथम संमेलन २५ ऑगस्ट २०२४ रोजी अमेरिकेतील मिशीगन राज्यात असलेल्या नॉर्थव्हिले याठिकाणी पार पडले. संमेलनाला सुमारे ७५ लेवा समाज बांधवांनी उपस्थिती नोंदविली.

सकाळच्या नाश्त्याला कचोरी आणि दुपारच्या जेवणात लेवा पाटलांचा प्रसिद्ध खाद्य पदार्थ भरीत, पुरी सोबत बटाट्याची भाजी, भात, मठ्ठा आणि जिलेबी असा मेनू होता. दुपारच्या सत्रात कलिंगड असा बेत रंगला होता. दुपारी गेम्समध्ये लहान मुले, महिला, पुरूष अशा तीन गटात संगीत खुर्चीत जवळपास सर्वांनीच भाग नोंदविला. त्यांनतर पिक्शनरी गेममध्ये सर्व उपस्थित लेवा गण रमले.
यावेळी वांगी भाजण्यापासून भरीत बनविण्यापर्यंत, कोशिंबीर बनविणे, मठ्ठा आणि बाकी सगळे पदार्थ करण्यात सर्व लेवा बंधु भगिनींनी उत्स्फूर्तपणे स्वतः हून पुढाकार घेवून ही काम केली. रोजच्या नोकरी किंवा व्यवसाया ठिकाणचे ताणतणावाचे वातावरण विसरून एक दिवस सर्वांनी फुल्ल आनंद लुटला.