कथित लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या मागणीवर लवकरच निर्णय घेऊ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस

0
36

मुंबई ः प्रतिनिधी

महाराष्ट्रात कथित लव्ह जिहादविरोधी कायद्याची मागणी करत अहमदनगरमधील राहुरी शहर आणि तालुक्यात सकल हिंदू समाजाकडून जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. आज (५ ऑगस्ट) सकाळीच या मोर्चाला सुरुवात झाली असून हजारो हिंदू नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. भाजपा आमदार नितेश राणेदेखील या मोर्चात  सहभागी झाले आहेत. राज्यात हिंदू मुलींचे-तरुणींचे फसवून अथवा बळजबरीने धर्मांतर केले जात असल्याचा दावा करत हिंदू  संघटनांनी हा मोर्चा काढला आहे. या मोर्चाबद्दल आणि कथित लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या मागणीवर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अलिकडच्या काळात राज्यात स्वतःची ओळख लपवून काहींनी मुलींशी लग्न केल्याच्या, त्यानंतर त्या मुलींचे धर्मांतर झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात अशा घटना समोर आल्या आहेत. त्यासंदर्भात सगळीकडून अशा प्रकारची (कथित लव्ह जिहादविरोधी कायद्याची) मागणी होत आहे. याप्रकरणी एक कायदा केला पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी स्वतः मागच्या काळात सभागृहात घोषित केले होते की, याप्रकरणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे कायदे आहेत,त्यानुसार आम्ही अभ्यास करत आहोत. त्याप्रमाणे आम्ही आगामी काळात महाराष्ट्रात निर्णय घेऊ.

दोन दिवसांपूर्वी विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी कथित लव्ह जिहाद प्रकरणावर भाष्य केले होते. फडणवीस म्हणाले होते, मुलींना फूस लावून पळवून नेणे, त्यानंतर त्यांच्याशी लग्न करणे, त्यांचं धर्मातर करणे आदी तक्रारींबाबत पोलिसांनी कशा पध्दतीने कारवाई करावी, यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून सर्व पोलीस ठाण्यांना मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली जारी केली जाईल, छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री येथील धर्मातंराच्या घटनेबाबत हरिभाऊ बागडे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here