साईमत, जळगाव : प्रतिनिधी
जालना येथील उपोषण करणाऱ्या लोकांवर लाठीहल्ला करण्यात आला. पुरुष, महिला, लहान मुले जखमी झाले. शेतकरी, शेतमजूर अनेकांवर लाठीहल्ला केला. राजकारण्यांकडून सत्तेचा गैरवापर करण्यात आला. आया बहिणींवर लाठीहल्ला करण्याची ज्यांची नीती असेल त्यांच्या हातात सत्ता ठेवणार नाही, या सगळ्यांचा आपण शंभर टक्के पराभव करू, या लढाईसाठी आपण सगळ्यांनी तयार राहिले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, एकनाथराव खडसे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, गुलाबराव देवकर, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, ॲड. रविद्रभैय्या पाटील, सतिष पाटील, रोहीत पवार यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मंगळवारी शहरातील सागरपार्क मैदानावर जाहीर सभा पार पडली. यावेळी शरद पवार बोलत होते. त्यांनी सध्याच्या परिस्थितीला सरकारला जबाबदार धरत जोरदार निशाणा साधला. सर्वत्र दुष्काळाची स्थिती असून जळगाव जिल्हा देखील या दुष्काळाच्या छायेत आहे. महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यासमोर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत, ही स्थिती बदलायची आहे. ही स्थिती एकदम बदलू शकत नाही. राज्यकर्ते जर आपल्या हातातील सत्तेचा योग्य वापर करतील तरच ही स्थिती बदलू शकते. आज राज्य आणि केंद्राची सत्ता ज्या भाजपच्या हातात आहे, त्यांना शेतकऱ्यांच्या दुःखाबद्दल काहीच वाटत नाही. दुष्काळग्रस्तांबद्दल काहीच वाटत नाही, प्यायला पाणी नाही, त्याची चिंता वाटत नाही. टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्ोळ राज्यावर आली आहे, हे सारे का आहे. तर चुकीच्या लोकांच्या हातात राज्य गेल्यामुळे हे झालं आहे, असा घणाघात शरद पवार यांनी केला.
जळगाव ते नागपूर दिंडींत लाखोफ्लचा जत्था
शरद पवार पुढे म्हणाले की, शेतकरी आत्महत्या का करत आहे, याचा तपास राज्य सरकारने करणे महत्त्वाचे आहे. १९८४-८५ मध्ये जळगाव ते नागपूर िंदडी काढण्यात आली. पहिल्या दिवशी हजार लोक होते. दुसऱ्या दिवशी २५,००० लोक झाले. तिसऱ्या दिवशी ५० हजार लोक जमा झाले. चौथ्या दिवशी एक लाख लोक जमा झाले आणि नागपूरपर्यंत लाखोंचा जत्था या िंदडीत सहभागी होता. त्यामुळे शेतकरी, सामान्य नागरिक यांचं राजकारणात महत्वाचं स्थान असते. त्याला कुठलीही ठेच पोहोचता कामा नये, असे आवाहन शरद
पवार यांनी केले.
भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण
आज राज्यात-केंद्रात मोदी साहेबांचं राज्य आहे, पण मोदी साहेबांनी काय केलं? नऊ वर्षात इतर राजकीय पक्ष फोडणे, शिवसेना फोडणे, राष्ट्रवादी फोडणे, फोडाफोडीच राजकारण करायचे, दुसऱ्या बाजूला हातात असलेली सत्ता लोकांच्या बाजूने न वापरता, त्यांच्यावरच ईडीचा वापर करायचा, लोकांना व्ोठीस धरायचे काम भाजप करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. अनिल देशमुख हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. काहीही संबंध नसताना अनेक महिने त्यांना तुरुंगात राहावे लागले, अनेकांना याचा अनुभव आला आहे. नवाब मलिक जुना नेता, त्यांनाही तुरुंगात टाकण्यात आले. लोकांनी दिलेली सत्ता लोकांच्या सन्मानासाठी कशी वापरता येईल हे पाहणे महत्वाचे आहे, मात्र भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचे शरद पवार म्हणाले.
शरद पवारांचे अभूतपुर्व स्वागत
जळगाव शहरात सकाळी ११ वाजता शरद पवार यांचे आगमन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांच्या वतीने तब्बल पाच जेसीबीच्या साह्याने भव्य अशी पुष्पृष्टी करत तब्बल सहा िंक्वटलचा भला मोठा हार घालून शरद पवार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फुलांची उधळन करत फटाके फोडण्यात आले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार यांची जळगाव जिल्ह्यात पहिलीच सभा होती.त्यामुळे प्रचंड जनसमुदाय उलटला होता.