साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर
येथील विविध शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांकडून ‘योगाचे पाठ’ गिरवून घेण्यात आले. यावेळी विविध शाळांमध्ये मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आर. टी. लेले हायस्कुल
पहुर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर.टी. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगाचे प्रात्यक्षिके सादर केली. गोपाळ थोरात, अनिल पाटील, संतोष भडांगे यांनी विद्यार्थ्यांसमोर योगाची प्रात्यक्षिके सादर केली. मुख्याध्यापक एस. आर. सोनवणे, पर्यवेक्षक मधुकर पवार यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.
मिल्लत उर्दू हायस्कुल
येथील शकील शहा यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिके करून दाखवित विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी मुख्याध्यापक झेड. एम. पटेल यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा लेले नगर
लेले नगर येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे योगशिक्षक महेश मोरे यांनी योगाचे महत्त्व सांगितले. त्यांनी विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांकडून योगाचे पाठ गिरवून घेतले. यावेळी मुख्याध्यापक चंद्रकांत साळुंखे, गणेश राठोड, किरणबाला पिंपळे उपस्थित होते.
डॉ. हेडगेवार प्राथमिक विद्यालय
महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ. हेडगेवार प्राथमिक विद्यालयात डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून योग दिनाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी प्राणायाम, ताडासन, शवासन, वृक्षासन आदी आसने घेण्यात आली. मुख्याध्यापक अजय देशमुख यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय
महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात योगशिक्षक अमोल बावस्कर यांनी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. यावेळी मुख्याध्यापिका व्ही. व्ही. घोंगडे, पर्यवेक्षिका कल्पना बनकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी योगासने केली. यासाठी क्रीडा शिक्षक हरिभाऊ राऊत यांनी सहकार्य केले. सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामेरे यांनी योगाचे महत्त्व विशद केले.
महावीर पब्लिक स्कुल
येथे मुख्याध्यापिका अनिता कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि चिमुकल्यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच चिमुकल्यांना जीवनात योगाचे महत्त्व पटवून सांगितले. निरोगी राहण्यासाठी नियमित योगा करण्याची गरज असल्याचे सांगितले.
आर.बी. कन्या विद्यालय
येथील मुख्याध्यापक सुधीर महाजन यांनी योगाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांसमोर योगाची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.