संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रतीला केले माल्यार्पण
साईमत/यावल/प्रतिनिधी
येथील सरस्वती विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे औचित्य साधून शाळेचे मुख्याध्यापक जी.डी. कुलकर्णी यांनी संविधानाची प्रत ही अत्यंत आदराने विद्यार्थ्यांसमोर ठेवून संविधानाच्या प्रतीला माल्यार्पण केले. याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक दीपक पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच संविधान दिनाचे महत्त्व व आजची स्थिती यासंदर्भात ज्येष्ठ शिक्षक प्रा. एस.एम.जोशी यांनी सविस्तर विवेचन केले.
संविधानाबद्दल बोलताना एस.बी.चंदनकार यांनी संविधानाचे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्व आपल्या भाषेत विशद केले. त्याचबरोबर अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक जी.डी.कुलकर्णी यांनी हक्क व कर्तव्य यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. तसेच संविधानाची प्रास्ताविका ही सर्वांनी सामूहिकरित्या म्हटली. डॉ.नरेंद्र महाले यांनी संविधान दिनानिमित्त संविधानातील कलम घटनादुरुस्ती त्याचबरोबर शैक्षणिक दृष्टिकोनातून संविधानातील कलम किती उपयोगाचे आहे, त्याचे विवेचन केले. सूत्रसंचालन एन.डी.भारुडे तर बी.पी.वैद्य यांनी आभार मानले.