पाळीव प्राण्यांपासून घ्यावयाची काळजीविषयी मार्गदर्शन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र गारखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक रॅबीज दिनाचे औचित्य साधत आरोग्य स्वच्छता, परिसर स्वच्छता, रॅबिस संसर्ग कसा होतो, भटकंती कुत्रे, प्राणी, पाळीव प्राण्यांपासून घ्यावयाची काळजी, कीटकजन्य आजाराविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती आरोग्य सेवक गोपाळ पाटील, किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली.
याप्रसंगी मुख्याध्यापक एस.आर. चव्हाण, उपमुख्याध्यापक एस.एन.चवरे, उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, पर्यवेक्षक प्रा.के.डी.निमगडे, पर्यवेक्षक जी.जी.अत्तरदे, पर्यवेक्षक प्रा.डी.झेड.गायकवाड, कला समन्वयक प्रा.विजय पाटील, माध्य.विभाग पर्यवेक्षक जी.जे.पाटील, पर्यवेक्षक एस.एन.चौधरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी जि.आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, प्राथमिक आरोग्य केंद्र गारखेडा वैद्यकीय अधिकारी डॉ.दानिश खान यांचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी प्रा.समीर घोडेस्वार, प्रा.सोनूसिंग पाटील, योगेश पाटील, एस.डी.पाटील, एस.के.घन यांनी परिश्रम घेतले.