साईमत/ न्यूज नेटवर्क/ सोयगाव
सोयगाव शहरापासून जवळ असलेल्या निंबा यती शिवारात शनिवारी रात्री चक्क बिबट्या ने सावज च्या शोधात मुक्काम ठोकला असल्याचे रविवारी आढळलेल्या बिबट्या च्या पावलांच्या ठशा वरून स्पष्ट झाले आहे. वनविभागाने या ठशांची छाया चित्रे तपासणी घेतले असून पंचनामा केला आहे. परिसरात शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांनी केले आहे.
सोयगाव शेंदूरणी रस्त्यावर मुक्त बिबट्या आढळल्याचे ताजी घटना असताना शनिवारी रात्री निंबायती शेती शिवारात बिबट्या ने मुक्काम ठोकल्याचे रविवारी सकाळी आठ वाजता आढळलेल्या फूट स्टेप वरून स्पष्ट झाले आहे, निंबायती शिवारातील शेतात व बांधावर ठिकठिकाणी बिबट्या चे पायांची ठसे रविवारी आढळून आल्या चे कळताच सोयगाव वनविभागाने घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेऊन सदर बिबट्या हा किती वयाचा आहे व कोणत्या दिशेने येऊन कोणत्या भागाकडे गेला याबाबत माहिती घेतली आहे.
दरम्यान बिबट्या हा वन्यप्राणी कधीही एका जागेवर राहत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांनी केले असून, या शिवारात शेतकऱ्यांना एकटे फिरू नये गटागटाने शेती शिवारात राहावे तसेच रात्रीच्या सुमारास पिकांची राखण करतांना बॅटरीचा उजेडात राहावे तसेच मोबाईल वर गाणे वाजवावे घुंगराची काठी हातात घेऊन रात्रीच्या वेळी शेत शिवारात आश्रय घ्यावा असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांनी सांगितले आहे. तसेच आढळून आलेले पायांची ठसे ही बिबट्याचेच आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले आहे.