साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुका विधी सेवा समिती, वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी, २१ सप्टेंबर रोजी ग्रामीण रूग्णालयात एच.आय.व्ही.आणि इतर शारीरिकरित्या संक्रमित रोगांच्या रूग्णांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराला अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. के. आर. बागुल, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. डी.पी. परार, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. के. ताडे, डॉ. संदीप जोशी उपस्थित होते.
शिबिरात डॉ. संदीप जोशी यांनी एच.आय.व्ही. आणि एड्समधील फरक समजावून सांगितला. तसेच एच.आय.व्ही. आणि एड्स हा आजार कशाप्रकारे होतो. त्याची लक्षणे कोणती याबाबत माहिती दिली. एच.आय.व्ही. चाचणी ग्रामीण रूग्णालयात मोफत करण्यात येते. त्याचा अहवाल हा गोपनीय ठेवण्यात येतो. याकरीता ग्रामीण रूग्णालयात ए.आर.टी. सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे. येथे एच.आय.व्ही. बाधीत रूग्णांसाठी मोफत वैद्यकीय चाचणी, औषधोपचार समुपदेशक करण्यात येते. तसेच एच.आय.व्ही. संसर्गजन्य नाही याबाबत माहिती दिली.
शिबीरास ग्रामीण रूग्णालयातील कर्मचारी, रूग्ण उपस्थित होते. यशस्वीतेसाठी तालुका विधी सेवा समितीचे कनिष्ठ सहाय्यक संदीप सोनवणे, शिपाई दिनेश पाटील, ग्रामीण रूग्णालयाचे ए.आर.टी. सेंटरचे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.