शिंदे केंद्रात मुजरा करणारे नेते ; शिवसेना आमदाराचा हल्लाबोल

0
43

औरंगाबादः प्रतिनिधी

राज्यात शिवसेनेशी(Shivsena) बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी भाजपसोबत(BJP) सत्ता स्थापन केली. यानंतर शिंदे यांच्या दिल्लीवारीचे प्रमाण वाढले. यावरून शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Demons) मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. शिंदे (CM Eknath Shinde) केंद्रात जाऊन मुजरा करणारे नेते आहेत. त्यांचा स्वतःचा असा बाणा नाही. भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना चोरून काम करावं लागत. ते लपून छपून दिल्लीत जातात. पण शिवसेनेत (Shivsena) सगळं ओपन होते,अशा शब्दात अंबादास दानवे यांनी शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते औरंगाबाद येथे बोलत होते.

राज्यात शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापन केले. सध्याचे मंत्रिमंडळ दोनच लोकांचं आहे. त्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रात विनोद होत आहेत, असेही दानवे म्हणाले. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे  यांचा नुकताच औरंगाबाद दौरा झाला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांत त्यांनी शिवसंवाद यात्रा घेतल्या. यावेळी शेकडो शिवसैनिकांची गर्दी जमली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची पायखलची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते औरंगाबाद दौऱ्यावर येत आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्या निमित्त सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहेत. मात्र असे शक्तिप्रदर्शन करण्याची अब्दुल सत्तार यांना नेहमीच सवय आहे. अब्दुल सत्तार लिमिटेड आणि त्यांचा मुलगा समीर सत्तार लिमिटेड आशा कंपन्या आहेत आणि त्यातून हे असे रोडशो आणि शक्तिप्रदर्शन करत असतात, असा टोलाही दानवे यांनी लगावला. मुख्यमंत्री रोड शो हे पहिल्यांदाच करत आहेत. इलेक्शन मध्ये रोड शो होतात मात्र असे रोड करण्याची परंपरा नाही. गद्दारी केल्यानंतर असे शक्तिप्रदर्शन करण्यात येत असल्याचे दानवे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here