साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील वाकी बु. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक नुकतीच घेण्यात आली. त्यात सरपंचपदासाठी ललीत लामखेडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ललीत लामखेडे हे जामनेर न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे माजी मुख्याध्यापक तथा विविध कार्यकारी सोसायटी वाकी बु.चे माजी चेअरमन नाना लामखेडे यांचे चिरंजीव होत.
निवडीवेळी माजी सरपंच पूजा पाटील, उपसरपंच ज्योती कदम, सदस्य कैलास सुरवाडे, मालता राजपूत, मनिषा पाटील, बी.डी. लामखेडे, निलेश पाटील, शालिग्राम कदम, सार्थक कदम, बापू पाटील, भागवत कदम, राजू पाटील, भिमसिंग राजपूत, प्रकाश पिंपळे, संजय राजपूत, विजय राजपूत, बबलू पाटील, भगवान राजपूत, हरी पाटील, वाय.टी. पाटील, सुभाष लामखेडे, राहूल लामखेडे, रमेश राजपूत, के.बी.पाटील, अशोक पाचपोळ आदी उपस्थित होते.
सर्वांनी एकजूट दाखवून निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल तसेच चांगला आदर्श निर्माण केल्याबद्दल नाना लामखेडे यांनी सर्व सदस्यांचे कौतुक केले. तसेच मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामांच्या माध्यमातून वाकी गावाला गतवैभव प्राप्त करून देण्याचे जाहीर केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळाधिकारी व्ही.पी. पाटील यांनी काम पाहिले. निवड प्रक्रियेत वाकीचे तलाठी मनोरे, ग्रामसेवक पवार यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन तथा आभार भास्कर लामखेडे यांनी मानले.
यांनी केले कौतुक
सरपंचपदी ललीत लामखेडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, नगराध्यक्षा साधना महाजन, सेवानिवृत्त अभियंता जे.के चव्हाण, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, पं.स.चे माजी उपसभापती नवलसिंग पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, बेटावदचे अशोक भोईटे, पं.स.चे माजी सदस्य अमर पाटील, पाळधीचे कमलाकर पाटील, नगर परिषदेचे गटनेता डॉ. प्रशांत भोंडे, वाकी खु.चे सरपंच सुधाकर सुरवाडे यांनी कौतुक केले आहे.