साईमत जळगाव प्रतिनिधी
तालुक्यातील वावडदा येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये “आजी आजोबा दिवस” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष एल. एच. पाटील, जितेंद्र पाटील, उपाध्यक्ष वीरेंद्र पाटील, संचालिका वैशाली पाटील, दगडूसिंग परदेशी, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पाटील, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सुजिता साळुंखे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. प्रसंगी स्वर्गीय विजयाताई लालसिंग पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणास स्मरण करीत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शाळेच्या शिक्षिका समूहाने “आई” ला संबोधून एक गीत सादर केले तसेच शाळेचे कलाशिक्षक कुशराजे पवार यांच्या समूहाने स्वागत गीत सादर केले.
आजी आजोबा दिवससाचे औचित्य साधून आजी-आजोबांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तीन गट प्रामुख्याने करण्यात आले होते. नर्सरी ते दुसरी विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांसाठी मोजा आणि मांडणी करणे, तिसरी ते दहावी विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांसाठी धोतर व नव्वारी साडी नेसविणे अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विजयी झालेल्या आजी-आजोबांना पारितोषिके वितरण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक दीपक सराफ यांनी केले तर, आभार प्रदर्शन शिक्षक प्रदीप वाघ यांनी मानले. यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पाटील, सुजीता सोळंखे, अन्वेषा माहेश्वरी, रत्ना माळी यांचे मार्गदर्शन लाभले तर शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले