११ कुमारिकांचे पूजन, ‘नामस्मरण महात्म्य’वर प्रबोधन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील कुसुंबा येथील गट नं. ३८६, सद्गुरू धाम, सद्गुरू पादुका व कल्पवृक्ष शिवमंदिर, पुरुषोत्तम पाटील नगरात सद्गुरू समर्थ दत्ता आप्पा महाराज यांचा १५ वा पुण्यतिथी महोत्सव आश्विन शुद्ध अष्टमी शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी पाद्यपूजन, अभिषेक, दासबोध वाचन करण्यात आले. यावेळी उपस्थित भगिनी यांच्या हस्ते ११ कुमारिकांचे पूजन करण्यात आले. तसेच सत्संग करण्यात आला. ‘नामस्मरण महात्म्य’ याबाबत जगदीश देवरे यांनी प्रबोधन केले. महाआरती, पुष्पवृष्टी व प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला विजय ढाके, धनराज सावदेकर, डी. के.चोपडे, श्री. काळे, मनोज राजपूत, भगवान पाटील, भागवत पाटील, भागवत चौधरी, केशव पेंटर, ज्ञानेश्वर जाधव, कल्पना वरकड, निर्मला देवरे, चारुलता सावदेकर, रेखा बागूल, विजया चोपडे, मंजुळा ठाकूर, संगीता अवचार, मीना चौधरी सोनार, अवचार ताई,काळे ताई, चंद्रकला चौधरी, चंद्रकला जाधव यांच्यासह परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अनिल कातोरे, दिलीप माळी, दयाराम बागुल यांनी परिश्रम घेतले.
            


