साईमत/ न्यूज नेटवर्क । मलकापूर ।
येथील तुषार नरवाडे याची भारतातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा ‘जेईई ॲडव्हान्सड’ अनुसूचित जाती प्रवर्ग २८६ रँक आणि महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेज प्रवेश परीक्षा एमएच-सेटमध्ये ९९.५० पर्सेंटाइल मिळवून नेत्र दीपक यश प्राप्त केल्याबद्दल ‘समतेचे निळे वादळ’चे संस्थापक-अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांनी तुषार नरवाडेचा शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
यावेळी अनिल झोपे, विजय तायडे, दिलीप इंगळे, श्री.निकम, रवी बाभुळकर, प्रमोद वानखेडे, प्रकाश नरवाडे, अनिल अहुजा, सुरेश वालेच्छा, अमर शर्मा, चंद्रकांत वर्मा, विनोद अकोटकर आदींनी तुषारवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
तुषारचे वडील उमेश नरवाडे हे भाजी बाजारात भाजीपाला विक्री करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतही आपल्या मुलावर उच्च शिक्षण आणि उच्च विचारसरणीचे संस्कार केले. त्याचा सर्व समाज बांधवांना सार्थ अभिमान आहे. तुषारला भारतातील अव्वल अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन देशसेवेसाठी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान द्यावयाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
