पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
विधानसभेच्या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी पोलीस निरीक्षक कासार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांच्या टीमकडून जामनेर-पहूर रस्त्यावर नाकाबंदी केली होती.यावेळी उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांनी एका चारचाकी वाहनाची झाडाझडती घेतल्यावर त्यात तब्बल १७ लाख २६ हजार ४०० रुपयाची रोख रक्कम आढळून आली होती. ती रक्कम जप्त करुन संबंधितांवर कारवाई केली होती.
निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ न देता शांततेत आणि सुरळीत निवडणूक प्रक्रिया पार पाडल्या.याकाळात जयसिंग राठोड यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलीस दलाने त्यांच्या सेवेची दखल घेत जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते जयसिंग राठोड यांना प्रशस्तीपत्र प्रदान करुन त्यांचा गौरव केला. याबद्दल त्यांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.