पायल नृत्यालय, रोटरी सेंट्रलतर्फे कथ्थक नृत्यावर ‘कृष्ण आराधना’

0
27

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

येथील पायल संगीत नृत्यालय आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती नगरातील डॉ.जी.डी.बेंडाळे वेल्फेअर सेंटरच्या नथमल लुंकड सभागृहात गायन-वादन-कथ्थक नृत्यावर आधारीत ‘कृष्ण आराधना’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ४८ विद्यार्थी विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. यावेळी सहभागी स्पर्धकांनी आपापली कला सादर करुन उपस्थितांचे मने जिंकून घेतली. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तर विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष कल्पेश शाह, सचिव दिनेश थोरात, भुवनेश्वरसिंग, रमा सिंग आदी उपस्थित होते. यावेळी पालक वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here