साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी :
तालुक्यातील कोल्हाडी ते निमखेड रस्त्याचे काम मंजूर कामापेक्षा कमी झालेअसून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन कामाचा दर्जा सुधारावा व संबधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा याविरुध्द ९ ऑगस्ट क्रांतीदिनी याच रस्त्यावर उपोषणास बसणार असल्याचा रवींद्र बावस्कर यांनी इशारा दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंर्तगत कोल्हाडी ते निमखेड रस्त्याचे डांबरीकरण काम झाले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे आहे. तसेच निविदेत कोल्हाडी ते निमखेड या लांबीची असतांना केले गेलेले काम कोल्हाडीपासून ५०० मीटर कमी करण्यात आले आहे. हि बाब निदर्शनास आणून देण्यास दि:- ६ जून 2022 रोजी बोदवड सार्वजनिक बांधकाम उपविभाग बोदवड येथे तक्रार देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही न झाल्याने पुढील चौकशी व कारवाई करावीसाठी कोल्हाडी येथील रहिवासी रविंद्र बावस्कर यांनी याच प्रलंबीत रस्तेवर९ ऑगस्ट रोजी पासून उपोषणास बसणार असल्याचा इशारा संबधीत विभागास दिला आहे.