जामनेरला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्षपदी किशोर पाटील

0
9

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाने नवीन नाव दिल्यानंतर जामनेर तालुक्यात तालुकाध्यक्ष पद रिक्त होते. नवीन नियुक्तीसाठी शनिवारी, १७ फेबु्रवारी रोजी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली जामनेर शहरात बैठक आयोजित केली होती. त्यात तालुकाध्यक्ष पदासाठी किशोर पाटील यांच्या नावाला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमुखाने अनुमोदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते किशोर पाटील यांचा सत्कार करुन जामनेर तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

पक्षाच्या संघर्षाच्या काळात पवार यांच्याशी एकनिष्ठ राहून किशोर पाटील यांनी वेळोवेळी भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात आंदोलन केले आहे. तालुक्यातील नागरिकांचे पंचायत समिती, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, शेतकऱ्यांचे प्रश्‍न आणि इतर कार्यालयीन कामे मार्गी लावून देण्यासाठी किशोर पाटील यांची तालुकाभर ओळख आहे.

निवडीवेळी माजी जि. प.सदस्य डिगंबर पाटील, लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ.मनोहर पाटील, व्ही. पी.पाटील, भगवान पाटील, माजी नगरसेवक अनिल बोहरा, राजू पाटील, श्‍याम सावळे, प्रशांत पाटील, आशिष दामोदर, प्रल्हाद बोरसे, संतोष झाल्टे, सचिन बोरसे, रुपेश पाटील, विनोद माळी, विशाल पाटील, श्री.गव्हारे, किशोर खोडपे, अर्जुन पाटील, विश्‍वजित पाटील, विवेक कुमावत, सागर कुमावत, प्रशांत सुरवाडे, सौरभ अवचारे, निलेश खोडपे, अमोल पाटील, उत्तम पाटील, मोहन चौधरी, अझर शेख शाहिद खालिद यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व सामान्य माणसाचे प्रश्‍न सोडविणारे किशोर पाटील यांच्या नियुक्तीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here