हिंगोलीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण

0
19

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील हिंगोली गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून अपहरण केल्याची घटना रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुरुवारी, २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील हिंगोली गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पीडित मुलगी झोपलेली होती. तेव्हा अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत पोस्ट लावून पळून नेत अपहरण केल्याची घटना घडली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल खुशाल पाटील करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here