एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
साईमत/जळगाव /प्रतिनिधी :
शहरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी, २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी, २३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. दरम्यान, २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी ही घरी असताना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून तिला ठोस लावून पळून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु तिच्या संदर्भात कुठलीही माहिती मिळू शकली नाही. अखेर तिच्या पालकांनी २३ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता एमआयडीसी पोलिसात याबाबत तक्रार दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक कार्य करीत आहे.
