साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या फुलंब्री येथील ६ वर्षीय मुलास २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पळवुन नेल्याची तक्रार फुलंब्री पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार वृत्त असे की, फुलंब्री येथील सार्थक हेमंत काथार ( वय ६ वर्ष ) या मुलास संशयीत आरोपी दिनेश अरुण कुलकर्णी ( वय 25 वर्ष) याने त्याचेकडील नॅनो कार क्रमांक-MH 40 KR 5950 चा वापर करुन मुलाला फूस लावून पळवुन घेऊन गेला आहे. असे पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान , अपहरण झालेला सार्थक हेमंत काथारने हिरवा शर्ट आणि निळी जिन्स परिधान केलेले आहे. तर संशयीत आरोपी दिनेश अरुण कुलकर्णी हा रंगाने गोरा असून त्याने अंगात लाल रंगाचा शर्ट घातलेला आहे.
यातील संशयीत आरोपी, नॅनो कार किंवा अपहत मुलाबद्दल काहीही माहिती मिळाल्यास फुलंब्री पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आला आहे. पो नि.निकाळजे 8975762906, सपोनि बनसोडे 9049980915 , पोउपनी धुळे 8108767620 .