खर्देला भाजपाचे ‘गाव चलो अभियान’ कार्यक्रम

0
26

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील खर्दे येथे भारतीय जनता पार्टीतर्फे सुरू असलेल्या ‘गाव चलो अभियानाचा’ कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यासाठी धरणगाव तालुक्याचे उपाध्यक्ष ॲड.व्ही.एस.भोलाणे यांची नेमणूक केली होती. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले.

गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गेल्या अडीच वर्षापासून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात सत्तेत आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात लोकांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत. तसेच सध्या सुरू असलेल्या सर्व केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेबाबत ॲड.भोलाणे यांनी माहिती दिली. तसेच ज्यांना शासनाच्या योजनेचा फायदा घ्यावयाचा असेल, त्यांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, गावातील कार्यकर्ते यांच्याशी योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क करावा. भाजपाचे सर्व पदाधिकारी आपल्या अडचणी निश्‍चित कळवतील. आतापर्यंत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जो विकास केलेला आहे. याबाबतही ग्रामस्थांना माहिती दिली.

अभियानात खर्दे गावचे बूथ प्रमुख तथा भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रोहिदास कोळी यांनी खर्दे गावात विकासाच्या पत्रकांचे वाटप केले. सोबत प्रमोद पाटील, राधेश्‍याम पाटील, श्रीराम पाटील, सुनीता पाटील, ज्ञानेश्‍वर कोळी, अजय कोळी, खर्दे येथील जय गुरुदेव माध्यमिक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक विलास चौधरी, वाय.जी.पाटील, धीरज पवार, चंद्रकांत भोळे, शिवाजी पाटील, शांताराम कोळी, हरिभाऊ चौधरी, श्‍याम कोळी, बाबुलाल पटेल, राजेश माळी, गोपीचंद मालचे, योगराज पाटील यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकाचे वाटप केल्यानंतर अभियानाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक योगेश पाटील तर आभार रोहिदास कोळी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here