कवी संमेलनात ३० कवींनी केले काव्य वाचन
साईमत/जामनेर /प्रतिनिधी :
नाशिक कवी संस्थेचे कवी संमेलन नुकतेच नाट्य परिषद सभागृह कालिदास कला मंदिरात पार पडले. कवी संमेलनात खान्देशरत्न कवी डी.डी.पाटील यांनी श्रावण महिना सुरू असल्याने ‘श्रावण व पाऊस’ विषयावर कविता सादर करून उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. कवी डी .डी .पाटील यांच्यासह उपस्थित कवींनीही श्रावणावरच कविता सादर केल्या. अध्यक्षस्थानी खान्देश कवी अजय बिरारी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाडीवर्हे येथील लेखक पुंजाजी मालुंजकर होते. कवी संमेलनात ३० कवींनी काव्य वाचन केले.
संमेलनात ‘कविण्यक चर्चा पाऊसच पडला’, ‘श्रावण प्रेम’, ‘श्रावणातला प्रेमाचा मोसम’, ‘पावसामुळे प्रेमाचा आलेला अडथळा’, ‘श्रावणातील सण’, ‘श्रावण सरी’ आदी विषयावर कवींनी सहभाग नोंदविला. खान्देश भूषण म्हणून त्यांची ओळख आहे, असे ज्येष्ठ साहित्यिक व जामनेर तालुका साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष कवी डी.डी. पाटील यांनी आपल्या कवितेने उपस्थित सर्व श्रोत्यांना श्रावण महिन्याचा आनंद मिळवून दिला.
संमेलनात कवी सोमनाथ साखरे, नितीन गाढवे, डॉ.भूपाल देशमुख, रमेश चौधरी, तु. सी.ढिकले, राजेंद्र चिंतावार, रविकांत शार्दुल, किर्ती दामले, अजय बिरारी आदी कवींनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन संस्थेचे कार्यवाह नंदकिशोर ठोंबरे यांनी केले.