Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»दोन लाखांचे खैर लाकूड वन विभागाच्या ताब्यात, आरोपी फरार
    क्राईम

    दोन लाखांचे खैर लाकूड वन विभागाच्या ताब्यात, आरोपी फरार

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoApril 2, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, यावल : प्रतिनिधी

    सातपुड्याच्या जंगलात तथा यावल तालुक्यात सर्रासपणे मौल्यवान वृक्षांची वृक्षतोड सुरू आहे. यावल वन विभागाने १ एप्रिल रोजी रात्री अंदाजे बाजारभावाप्रमाणे दोन लाख रुपये किमतीचे खैर जातीचे लाकूड जप्त केले. परंतु वृक्षतोड करणारे आरोपी मिळून न आल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. असे असले तरी सातपुडा जंगलात तथा यावल तालुक्यात सागवानी खैर आणि आदी वृक्षतोड होत असताना सातपुडा डोंगराप्रमाणे वन विभागातील काही ठराविक अधिकारी, कर्मचारीही आपले कर्तव्य करताना तटस्थ भूमिका निभावत आहेत का? याबाबत सातपुडा डोंगर परिसरातील नागरिकांमध्ये अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

    यावल पश्‍चिम वनक्षेत्राच्या सामूहिक गोष्टी पथक हे गस्त करीत असताना नाल्यात अवैधरित्या तोड केलेला खैर मिळून आला.वृक्षतोड झाल्यानंतर गस्ती पथकाला खैर जातीचे वृक्षतोड झालेली लाकडे मिळून येतात आणि आरोपी फरार होतात. वृक्षतोड करताना गस्ती पथकाला कोणी आढळून येत नाही का? सातपुडा जंगलात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच वृक्षतोड होत असल्याचे दबक्या आवाजात चर्चिले जात आहे. सोमवारी खैर जातीचे लाकूड जे जमा केले. ते जमा केल्यानंतर जप्त मालावर ‘जप्त शिक्का’ वनपाल, वनरक्षक संबंधित वनक्षेत्रपाल किंवा गस्तीपथक आरएफओ यांच्यापैकी कोणी मारला? माल केव्हा जप्त केला? किती वाजता ताब्यात घेतला आदी माहिती प्रसिद्धी माध्यमापासून लपविण्याचे कारण काय? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहे.

    पश्‍चिम क्षेत्राच्या वन विभागाचे पथक हे सामूहिकरित्या गस्तीवर असतांना त्यांना १ एप्रिल रोजी निंबादेवी जंगल परिसरात अवैधरित्या तोड केलेले खैर जातीचे वृक्षाची तोड करून टाकलेले लाकुड बेवारस अवस्थेत दिसुन आले. यावेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आजूबाजूस फिरून पाहणी केल्यावर त्याठिकाणी आरोपी मिळून आला नाही, असे सांगण्यात येत आहे. मुद्देमालाची मोजमाप केल्यावर खैर जातीचे आहे. त्याची संख्या नग ५१ घन मीटर आहे. त्याची शासकीय किंमत २५ हजार ५८४ इतकी आहे. बाजारात अंदाजे दोन लाख रुपये किंमत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon: बसस्थानकावरील गर्दीत महिलेचे ४० हजारांचे मंगळसूत्र लंपास

    March 2, 2026

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.