भाजपशी लढण्यास खडसे सक्षम ; विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी इच्छुक

0
51

मुंबई : प्रतिनिधी साईमत लाईव्ह

राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिंदे सरकार स्थापन झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ४० आमदार असल्याने संख्याबळाअभावी शिवसेनेला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळू शकलेले नाही. त्यामुळे विधानसभेत सर्वात मोठा विरोधीपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस समोर आल्याने विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची निवड करण्यात आली आहे. तर विधानसभापाठोपाठ विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेला मिळण्याबाबत साशंकता आहे. अशातच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेने दावा केला आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी अध्यक्षांकडे नाव पाठवणार आहे. विधान परिषदेत ७८ सदस्य आहेत. यामध्ये आमच्याकडे विधान परिषदेत सर्वाधिक १३ सदस्य आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेलाच मिळायला हवे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी देखील या पदासाठी इच्छुक आहे. भाजपशी लढण्यासाठी एकनाथ खडसेंसारखे अनुभवी नेते आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here