साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील खडकी बु.ला महिला व बाल भवनात राममंदिरासमोर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा व उच्चाटन अध्यादेश २०१३ कायद्याला १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कायद्याविषयी जनजागृतीसाठी राज्यव्यापी जनसंवाद यात्रा महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात प्रचार व प्रसार करीत आहे. त्यानिमित्त यात्रेच्या समन्वयक नंदिनी जाधव, पुणे (राज्य कार्यकारिणी सदस्य म.अ.नि.स.) यांनी साध्या सोप्या भाषेत कायदा व त्यातील कलम याविषयी विस्तृत मांडणी करत प्रबोधन केले. प्रारंभी भगवान रणदिवे, सातारा यांनी चमत्कार सादरीकरण करून त्यात वैज्ञानिक प्रयोग व हातचलाखी करून बुवा बाबा कशा प्रकारे गंडावतात यासंदर्भात प्रबोधन केले. यावेळी जादूटोणा विरोधी कायदा राज्यव्यापी जनसंवाद यात्रा वाहनाचे स्वागत पोलीस पाटील विनायकबापू मांडोळे यांनी केले. अध्यक्षस्थानी सरपंच सचिन पवार होते.
याप्रसंगी वैशाली निकम, प्रा.गौतम निकम, प्रा.विजया चव्हाण, दिलीप चव्हाण (उद्योजक), धनंजय सुकदेव मांडोळे, गोकुळ जनार्दन कोल्हे, अलकनंदा भवर, गुलाबदादा खाटीक, गणेश सावंत-मराठे, विलास आधार चव्हाण, सचिन मांडोळे, ॲड.कोमल सचिन मांडोळे, नंदू पवार, आनंद बागुल, वाल्मिक जाधव, योगेश पठाडे, विजय मोरे, नितीन जाधव, दयाराम निकम, विकास जगताप, अशोक एरंडे, ऋषी वायकर, कैलास पाटील, कैलास चव्हाण आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी ग्रामस्थ, तरुण मंडळी तसेच शाखा खडकी बु.सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक नीता सामंत, सुत्रसंचालन प्रल्हाद सावंत तर आभार गणेश पवार यांनी मानले.