तात्काळ मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याच्या खासदारांनी दिल्या सूचना
साईमत/भडगाव/प्रतिनिधी :
भडगाव शहरात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खा. स्मिताताई वाघ यांनी शहरातील विविध भागांमध्ये भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
सदर भेटीत मुख्याधिकारी रवींद्र लांडे, शेतकरी संघ संचालिका व नगरसेविका योजना पाटील, अध्यक्ष सोमनाथ पाटील, भडगांव मंडळ अध्यक्ष विनोद नेरकर, कजगांव मंडळ अध्यक्ष अनिल पाटील, तालुका चिटणीस भगवान पाटील तसेच शैलेश पाटील, डॉ.पंकज जाधव, शेखर पाटील, कार्यकारी सदस्य नूतन पाटील, प्रमोद पाटील, मनिषा पाटील, रेखा शिरसाठ, जिजाबाई चव्हाण, सुरेखा वाघ, कुणाल पाटील, प्रदीप पाटील, किरण शिंपी, विशाल पाटील, विशाल चौधरी, विकास महाजन, गोरख महाजन, राहुल देशमुख, दिलीप वाघ, पांडुरंग पाटील, जवाहर चव्हाण, भूषण देवरे, डी. डी. पाटील सह नगरपरिषदेचे विभाग प्रमुख आणि सहकारी कर्मचारी उपस्थित होते.
तसेच खासदार व उपस्थित मान्यवरांनी सरकारी दवाखाना, अग्निशामक केंद्र, शिवनेरी गेट परिसर, जयहिंद कॉलनी मराठी शाळा परिसर, शेतकरी संघ, फ्रुटसेल, दत्ताआबा शॉपिंग तसेच तहसील कार्यालय समोरील परिसर याठिकाणी मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
खा.स्मिताताई वाघ यांनी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना निर्देश दिले की, नुकसानग्रस्त भागातील त्वरित पंचनामे करावीत आणि नागरिकांसाठी तात्काळ आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव पाठवावा. तसेच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून बंद स्थितीत असलेल्या मोऱ्यांचे दुरुस्तीचे काम करावे आणि नवीन मोऱ्यांसाठी प्रस्ताव स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली तयार करून त्वरीत पाठवावा.या भेटीदरम्यान नागरिकांना दिलासा दिला गेला आणि प्रशासनाच्या कार्यप्रणालीबाबत विश्वास निर्माण केला.