दिगंबर जैन समाजातर्फे गुणवंतांसह उपवासधारकांचा सत्कार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जीवनात विद्यार्थ्यांनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, चिंतामुक्त जीवन जगावे, प्रेम प्रकरणांपासून दूर राहावे तसेच १० ते १२ तास अभ्यास करावा. पाठीवर कौतुकाची थाप मिळवून समाजाचे नाव उज्ज्वल करावे. शिवाय आई-वडिलांची लाज राखा, त्यांच्यामुळेच तुमचे आजचे भविष्य उज्ज्वल आहे. यासोबतच विद्यार्थी, पालक आणि समाज यांचे योग्य संस्कार राखण्याचे महत्त्व अधोरेखित करत मुनिश्री आस्तिक्य सागर महाराज यांनी दिगंबर जैन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना आणि पर्युषण उपवासधारकांना उपदेश दिला. दिगंबर जैन बहुउद्देशीय मंडळाने सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित सत्कार समारंभात ७२ गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि १६ पर्युषण उपवासधारकांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम प. पू. मुनिश्री १०८ आस्तिक्य सागर महाराज व प. पू. मुनिश्री १०८ विनियोग सागर महाराज यांच्या छत्रछायेखाली पार पडला. अध्यक्षस्थानी प्रादेशिक परिवहन निरीक्षक रवींद्र नारळे होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रियंका फुलमोगरे यांच्या मंगलाचरणाने झाली.
महावीरांची शिकवण आचरणात आणावी
प्रत्येक विद्यार्थ्याने भगवान महावीरांची शिकवण आचरणात आणल्यास हमखास यश मिळते, असे मार्गदर्शनात आ.राजुमामा भोळे यांनी सांगितले. यावेळी प्रवीण पगारिया, दिलीप गांधी, धन्यकुमार जैन, स्वरूप लुंकड, निर्मल चांदीवाल, अजित कुरकुटे, विश्वनाथ चतुर, ॲड.जयश्री नारळे, महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सुवर्णा जैन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्हासह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी पर्युषण उपवासधारकांचा सत्कारही करण्यात आला. सत्काराच्या कार्यक्रमानंतर मुनिश्री आस्तिक्य सागर महाराज यांचे प्रवचन झाले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी दिगंबर जैन बहुउद्देशीय मंडळाचे पदाधिकारी गणेश डेरेकर, महावीर सैतवाल, दीपक फुलमोगरे, विश्वनाथ चतुर, दीपक जैन, अजय सूर्यवंशी, योगेश काळे, मुरलीधर काळे, देवेंद्र डेरेकर, राजेंद्र काळे, प्रशांत फुलमोगरे, विवेक फुलमोगरे, राजेंद्र सैतवाल, विजय सैतवाल, गौरव सैतवाल, तेजस डेरेकर, पवन चतुर, चंदन चतुर, प्रफुल सैतवाल, सतिश सूर्यवंशी, दिलीप जैन, राजेंद्र जैन, लोकेश जैन, प्रमोद अवतारे, रमेश खोबरकर, पियुष जैन, पंकज सैतवाल, सुरेश खोबरकर, मनोहर संगवे यांच्यासह महिला मंडळाचे पदाधिकारी रत्नमाला सैतवाल, सीमा डेरेकर, संगीता सैतवाल, भारती फुलमोगरे, रेखा सैतवाल, कविता सैतवाल, ज्योती सूर्यवंशी, वर्षा काळे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक धन्यकुमार जैन तर सूत्रसंचालन महावीर सुलाखे, भूषण जैन यांनी केले.