साईमत, नवापूर : प्रतिनिधी
शहरात श्रावण सोमवारी कावडयात्रा समितीतर्फे कावडयात्रा सालाबादाप्रमाणे काढण्यात आली. शहरातील सरदार चौक भागातील नागेश्वर महादेव मंदिरात विधीवत पूजन डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित, जि.प महिला बालकल्याण समिती सभापती संगिता गावित यांनी केले. यानंतर महादेवाच्या पालखीचे पूजन आणि कावडयात्रेचे पूजन करुन यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजपचे सरचिटणीस राजेंद्र गावित, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, अजय पाटील, आयोजक दर्शन दीपक पाटील, किरण टिभे, नागेश्वर महादेव मंदिराचे ट्रस्टी हरीष पाटील, हेमंत जाधव, जितेंद्र अहिरे, विक्की चौधरी, राहुल दुसाणे, मेहुल भोई, रजु अग्रवाल, अजय अग्रवाल, सागर टिभे, राहुल मराठे, भागवत चौधरी, नितु शर्मा, शमा कुलकर्णी, जया परदेशी यांच्यासह भाविक उपस्थित होते.
कावडयात्रेत भाविक ढोल ताशांच्या गजरात नाचत ‘हर हर महादेवा’च्या जयघोष करत कावडयात्रा पुढे जात सरदार चौक, लाईट बाजार, कुंभारवाडा, शिवाजी रोड, करंजी ओवारा मार्गाने गोमुख येथे कावडयात्रा रवाना झाली. गोमुख येथे महादेवाचे मंदिर असुन याठिकाणी गुजरात व महाराष्ट्राचे भाविक श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने येत असतात. नवापूर शहरात दरवर्षी कावडयात्रेचे आयोजन दर्शन पाटील करत असतात. कावडयात्रेचे यंदा १२ वे वर्ष आहे. नवापूर शहरापासून गोमुख हे २४ कि.मी आहे. गोमुख मंदिर हे गुजरात-महाराष्ट्र सीमेवर वसले आहे. दरवर्षी कावडयात्रेत भाविकांची संख्या वाढत आहे.