पावसात भक्तगण झाले ओलेचिंब, गिरणा नदीच्या जलाने केला अभिषेक
साईमत/जळगाव/प्रतिनिधी-
शहरातील पिंप्राळा भागातील सोनीनगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरातून श्रावणमास कावड यात्रा गिरणा नदीच्या किनाऱ्यावर पोहचल्यावर “हर हर गंगे’’च्या जयघोषात गिरणा नदीची महिला शिवभक्तांनी विधीवत पूजा करून कावडातील पात्रात जल घेऊन भर पावसात ओलेचिंब भिजून भाविकांसह महिलांनी डोक्यावर तांब्याचे कळस तर काहींनी खांद्यावर कावड घेऊन
जागृत स्वयंभू महादेवाच्या शिवलिंगाला गिरणानदीतून आणलेल्या जलाने अभिषेक करण्यात आला.
शिवभक्तांनी रविवारी दुपारी एक वाजता सावखेडा येथील गिरणानदीतून कावडीतील पात्रात जल घेऊन पावसाचा आनंद द्विगुणित करत ओलेचिंब भिजून संगिताच्या तालावर पाय थिरकत महादेवाचा जयघोष करत शिस्तीने रस्त्याच्या कडेने चालत होते. कावड यात्रेत गणपती नगर, ओंकार पार्क, बाबुराव नगर, सोनी नगरातील महिला, पुरूष, युवा वर्ग, युवती बाळगोपाल शिवभक्तांनी पावसाचा आनंद घेत कावड यात्रेत उत्साहात सहभागी झाले होते. श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी सकाळी आठ जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
जलाभिषेकानंतर दुग्धाभिषेक
जलाभिषेकनंतर दुग्धाभिषेक करून श्रीकांत सुपेकर-आशाबाई सुपेकर, भैय्यासाहेब बोरसे-उषा बोरसे, संदीप जाधव- पूनम जाधव, शरद पाटील-सुवर्णा पाटील, राहुल गायकवाड-कविता गायकवाड, प्रितेश पाटील- जागृती पाटील, पंकज राजपूत -कल्याणी राजपूत, हेमंत भावसार-देवयानी भावसार असे आठ जोडपे आणि मनमाडचे कन्हैया शर्मा, शिवांश शर्मी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी नरेश बागडे, मधुकर ठाकरे, ममता राणा, सरदार राजपूत, राहुल गायकवाड, उमेश सोनी, वेदांत बागडे, नारायण येवले, निलेश जोशी, संजय भोई, पंकज राजपूत, योगेश पांडे, डॉ.सरकार बंगाली, नंदिता जोशी, राधिका बागडे, पूजा ठाकरे, अनिता महाले, पूनम पारखे, आशा भोई, कल्याणी राजपुत, संगिता भोई, उज्ज्वला पाटील, मंगला शिरसाठ, कावशी बंगाली, अर्चना महाजन आदींनी परिश्रम घेतले.