साईमत जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये दिवाळी उत्साहा मध्ये साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अविनाश धर्माधिकारी, शाळेचे प्राचार्य प्रविण सोनवणे, समन्वयिक संगीता तळेले , स्वातीअहिरराव, अनघा सागडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी हेम पाटील ,पार्थ नारखेडे, ऋषिकेश बारी, पियुष करडे देवेश पाटील देवंश जैस्वाल, श्रुती बराठे,हितांश पाटील अन्वेषा देशपांडे, मिथिलेश वाघ, कृष्णा चौधरी, कुलश्री कुलकर्णी प्रत्यूशा शर्मा, अन्विता सोनवणे, खुशी पुष्पकुमार मुंधरा, लीशा फुलफगर या विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या पाच दिवसाचे महत्त्व सांगितले. संगीत शिक्षक गणेश देसले तसेच ओजस्विनी देसले या विद्यार्थिनीने दिवाळीचे गीत सादर केले तर इयत्ता चौथीची वैष्णवी पवार व आठवीच्या विद्यार्थिनी यांनी नृत्य सादर केले.
या उत्सवासाठी किशोर भोई आणि त्यांच्या ग्रुपने एक सुंदर नाटक सादर केले.यानंतर शाळेचे प्राचार्य श्री प्रविण सोनवणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास विद्यार्थ्याचे पालक हितेश पाटील उपस्थित होते.कार्यक्रम संपल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवम सिंग व रिद्धी नगरकर, भार्गवी चव्हाण , अन्वयी देशपांडे या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख रूपाली पाटील व वृषाली धर्माधिकारी अनिरुद्ध डावरे , सुनंदा मिश्रा, कैलास पाटील होते. कार्यक्रमासाठी शाळेचे प्रशासकीय अधिकारी मिलिंद पुराणिक यांचे मार्गदर्शन व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.