साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी
ओझरटाऊनशिप : शितो रियू कराटे डो क्लब मार्शल आर्ट नाशिक यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या खुल्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत एच.ए.ई.डब्ल्यू .आर.सी.संस्था संचलित ओझरटाऊनशिप मधील कराटे क्लासच्या 28 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले असुन 20 विद्यार्थ्यांनी सुवर्ण , 4 विद्यार्थ्यांनी सिल्व्हर व 4 विद्यार्थ्यांनी कास्य पदक पटकावित स्पर्धेतील त्रुतीय क्रमांकाचे सांघीक पारितोषिक ही पटकाविले आहे.
विभागीय संकुल मीनाताई ठाकरे स्टेडियम पंचवटी नाशिक येथे वयोगटानुसार झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत राज्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या 430 स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यामध्ये स्कुल आँफ ओरिएंटल मार्शल आर्ट ओझरटाऊनशिप कराटे क्लासच्या 28 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यामध्ये मुकुंदचव्हाण, श्रीरंग सताळकर, तकशिल त्रिविक्रम, सावंत त्रिविक्रम, आर्याही यादव, मनस्वी साळवे, नित्या बेदा, जयसोननीया, हिमांश सोननीया, ध्रुव क्रुष्णकुमार, दिव्यांशी गुंजाळ, अनुराग सिंग, एकांश मीना, नवांश मीना, दिपीका हांडे नेत्रा हांडे, मैथलीआहुजा, पुर्वा वाघ, भक्तीआहेर, आक्षिता सोनी, नव्या सिंग, हरी कीर्तना, नाविका, सिंग,शुभांग्या, भुमिका जाधव, माधवी जाधव, अंशुमन प्रजापती व हेम चव्हाण या विद्यार्थ्यांचा समावेश होता त्यापैकी 20 विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक, 4 विद्यार्थ्यांनी रौप्य व 4 विद्यार्थ्यांनी कास्य पदक मिळवित स्पर्धेतील त्रुतीय क्रमांकाचे सांघिक पारितोषिक ही पटकाविले
स्पर्धेनंतर त्याच ठिकाणी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले, व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्य प्रशिक्षक एस.के.शर्मा, प्रशिक्षक नितिन वाघ, भारत मुरे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षकांसह यशस्वी विद्यार्थ्यांचे एच ए एल कामगार संघटना, एच.ए.ई.डब्ल्यू. आर.सी. संस्था, क्रेडिट सोसायटी आदि संस्थाचे पदाधिकारी, कामगार व अधिकारी यांनी अभिनंदन केले.