साईमत/ न्यूज नेटवर्क/जळगाव :
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी समाजातील महिलांना लाभ मिळावा, यासाठी कंजरभाट समाज युवा फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी तात्काळ बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन विविध निर्णय घेण्यात आले.
बैठकीला संस्थेचे अध्यक्ष विजय अभंगे, उपाध्यक्ष सचिन बाटूंगे, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, सचिव राहुल नेतलेकर, सदस्य प्रदीप नेतलेकर, गौतम बागडे, संदीप गारुंगे, नरेश बागडे, राहुल दहियेकर, संदीप बागडे, पंकज गागडे, संतोष इन्द्रेकर, जयेश माछरे, कार्तिक बाटूंगे, गणेश बागडे, पिंट्या नेतलेकर, महेंद्र बागडे, प्रकाश दहियेकर, नितीन नेतले, राकेश बागडे, सुदाम बागडे आदी समाजबांधव उपस्थित होते.
कंजरभाट समाजाच्या महिला आज कागदपत्रे तयार करण्यासाठी वणवण फिरत आहेत. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी प्रमुख कागदपत्र म्हणजे आधारकार्ड अपडेट असणे आवश्यक आहे. त्यासाठी आधार अपडेटचे पोर्टल तात्काळ आपल्या भागात सुरू करावे. तसेच एकाच छताखाली सर्व प्रकारच्या योजनांची माहिती मिळावी. समस्या सोडविण्यात याव्या, यासाठी सदस्यांनी होकार दिला. वंचित, निराधार, विधवा महिलांसाठी जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन समाजाच्या उन्नतीसाठी महिलांना योजनांचा लाभ द्यावा, महिलांना सहकार्य करावे, असे निर्णय बैठकीत घेण्यात आले.
योजनेसाठी दोन टप्प्यात अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. यासाठी कंजरभाट समाजातील महिलांनी योजनेला लागणारी कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन फाउंडेशनतर्फे केले आहे.