Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Kanjarbhat Should Bring : कंजरभाट समाजातील उपेक्षित घटकांना प्रवाहात आणावे : जयराज भाट
    जळगाव

    Kanjarbhat Should Bring : कंजरभाट समाजातील उपेक्षित घटकांना प्रवाहात आणावे : जयराज भाट

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 17, 2025Updated:June 17, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ओझरला तमायचे युवा फाउंडेशनच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जयराज भाट यांचे प्रतिपादन

    ओझर, ता.जुन्नर/जळगाव :

    आजही कंजरभाट समाजातील शिकलेल्या मुला-मुलींना नोकरी नाही. उच्च शिक्षण घेऊन बेरोजगार फिरताना युवक दिसत आहे. शिक्षणात आपली मुले-मुली भटकू नये, आजारी असलेल्यांची अवस्था वाईट होऊ नये, सगळ्या लोकांना मदत व्हावी. तसेच राज्यभरातील तमायचे संघातील लोकांना सशक्त व समृद्ध करून महिलांना सशक्तीकरण करून तळागाळातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष जयराज भाट यांनी केले. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र विघ्नहर ओझर येथे विमुक्त कंजारभाट समाजातील तमायचे परिवार युवा फाउंडेशनची सामाजिक सशक्तीकरण व प्रबोधन बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला
    उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अष्टविनायक विघ्नहर गणपतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

    बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष जयराज भाट, नंदुरबारचे राकेश तमायचे, अंबरनाथचे विनोद तमायचे, जळगावचे नरेश बागडे, शशिकांत बागडे, जुन्नर तालुक्याचे सरपंच कुलदीप तमायचे, धीरज तमायचे, कांतीलाल तमायचे, मनोजबाबा माछरे, नरेश बागडे, संजय मोती, विजय बागडे, शशिकांत बागडे, राकेश तमायचे, गणेश बागडे, रवी तमायचे, करण तमायचे यांच्यासह जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, ठाणे, पुणे, कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    तमायचे युवा फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    तमायचे युवा फाउंडेशनच्या कार्यकारिणीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयराज भाट (कोल्हापूर), उपाध्यक्ष युवराज तमायचे (नारायणगाव), महासचिव विनोद तमायचे (अंबरनाथ, ठाणे) खजिनदार विशाल तमायचे (विघ्नहर ओझर,) कार्याध्यक्ष राकेश तमायचे (नंदुरबार), सहसचिव शशिकांत बागडे (जळगाव), मुख्य सल्लागार कुलदीप तमायचे, कार्यालय सचिव विक्की तमायचे (पिंपरी, पुणे) सदस्यांमध्ये विजय बागडे (जळगाव), अजय उर्फ टोनी बागडे, रवी तमायचे (पुणे), मनोज तमायचे, करण तमायचे (दोंडाईचा) विशाल तमायचे अशा सर्व पदाधिकाऱ्यांचा निवडीत समावेश आहे.

    तमायचे परिवाराला समृद्ध करण्याचा फाउंडेशनचा उद्देश

    राज्यभरातील तमायचे परिवाराला सशक्त व समृद्ध करणे हाच फाउंडेशन स्थापनेचा उद्देश आहे. तसेच महिला सशक्तीकरण, शिक्षण, रोजगार, सामूहिक विवाह सोहळा करणे असल्याचे विनोद तमायचे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यशस्वीतेसाठी कुलदीप तमायचे, युवराज तामचीकर, विशाल तमायचे, बबलू तमायचे, लाखन तमायचे, नितीन तमायचे, गोविंदा तमायचे, अतीष तमायचे, सचिन तमायचे, बेराज तमायचे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विशाल तमायचे तर आभार युवराज तमायचे यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.